नमस्कार मित्रांनो जर आपण विरह वेदना मराठी कविता, विरह चारोळ्या शोधात असाल तर आपल्याला या पोस्ट मध्ये अनेक सुंदर marathi prem virah kavita मिळतील ज्या आपल्याला नक्कीच आवडतील. ह्या सुंदर प्रेम विरह कविता आपण सोसिअल मीडिया वर आणि आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेयर करू शकता तरी आपल्याला हि marathi virah kavita पोस्ट कशी वाटली. हे आम्हाला नक्कीच कळवा
कोरे ठेऊन पान मनाचे
आठवणीत का बोलतेस
बंद दरवाजे मिलनाचे
स्वप्नातच का भेटतेस.
सांगायचे होते तुजला
खेळ ते विरहाचे होते
क्षणात नाते आपले
विलग झाले होते.
तिच्या सैलसर मिठीत
जेव्हा माझेपण वितळत होते
तिच्या साऱ्या मौनांचे जणू
मज भाषांतर उमगत होते
रात्र सरली कळत नकळत
निःशब्द मोगऱ्याचा दरवळ
केवढे तिला सांगायचे असते
स्पर्शात उमगली हिरवळ
लेखक- संदीप राऊत
कोण्या देवाची शप्पथ घालू तूच सांग,
कोण्या वळणावर मी तुझी वाट नाही
बघितली तूच सांग,
रिते होते आयुष्य सारे
तुझ्या येण्याने ते पूर्ण झाले,
कोण्या भाषेत तुला समजावून सांगू
तूच सांग !
लेखक -लिना
आता परत नाही जायचे त्या शहरात
जिथे आपलं मन रमत नाही
तु रहा नेहमी खुश पण
मला तुझ्याशिवाय जमत नाही
जिच्यासाठी सोडली साथ माझी
राहो नेहमी जोडी तिची तुझी
आता राहील ना आयुष्यात तुझ्या
परत ना ये जीवनात माझ्या
माझी साथ सोडली तशी नको सोडू तिची
नाहीतर स्वप्न राहतील अपूर्ण तुझ्या आयुष्याची
नवी सुरुवात नव्या जीवनाची
धडपड फक्त स्वतःसाठी जगण्याची
आता ना कोणासाठी झुरण्याची
ओढ फक्त आता आनंदी राहण्याची
लेखक -Wr.Pallavi
भान हरवायला काही नाही
समोर आल्यावर तू,
मी भानावर असले पाहिजे
डोळ्यात डोळे टाकून तुझ्या,
मला बघता यायला पाहिजे
ओठांत दाटून आलेलं शब्द,
तुझ्यासमोर व्यक्त करता आले पाहिजे
ओसरलेला स्पर्श तुझा,
मला अनुभवता आला पाहिजे
नवखी नाही मी,
पण तुला मला ओळखता आलं पाहिजे
भान हरवायला काही नाही,
पण तुझ्यासमोर मला भानावर राहता आलं पाहिजे.
लेखक –swapn_prem_vedi
जा प्रिये, खुश रहा तू,
परकी झालीस तरी माझी आहेस तू !
जा प्रिये, खुश रहा तू,
परकी झालीस तरी माझी आहेस तू !
सदिच्छा जा घेऊन माझ्या तू,
आज दुसऱ्याचे घर सजव तू !
जा प्रिये, खुश रहा तू,
परकी झालीस तरी माझी आहेस तू !
मन नाही मानत, पण खरं आहे हे,
माझं मन तोडून आज चाललीस तू !
तुझ्या बेवफाईला मी काय शिक्षा देऊ
तुझ्या विवाहाला मी काय तोहफा देऊ
आज काहीही नाहीय माझ्या हाती,
भग्न हृदयाचा का मी श्राप देऊ ?
जा तू हो सुखी, तुझ्या नव्या जीवनात तू
जा तू रहा आनंदी, तुझ्या नव्या आयुष्यात तू
बस मी राहीन एकटा, दुःख बाळगीत उरी,
बसेन लाटांचा खेळ पहात सागर किनारी.
तुला संभाळण्यास तुझा नवीन साथी मिळालाय
तुला थIमण्यास त्याचा आपलासा हात मिळालाय
माझं काय, माझी नाव अशीच बुडत राहील,
फुटता फुटता, किनारी येऊन आदळत राहील.
माझी मर्जी कोण संभाळतोय इथे
माझा देवही माझ्यावर रूसलाय जिथे
तोल जातोय माझा, मीच मला सांभाळतोय,
तेच विरहाचे दुःख पुन्हा उरी बाळगतोय.
हा जाचक विरह मला आयुष्यभर छळेल
तुझा नवीन संसार तुला जीवनभर फळेल ?
तुझा जीव हळूहळू नव्या घरी रुळेल,
माझ्या दुःखांची परिसीमा तुला कशी कळेल ?
ही वेदना आयुष्यभर साथ करील मजला
ही संवेदना जीवनभर टोचत राहील मजला
या दिलाचा काय कळेल तुला दर्द ?
कुणी म्हटलंय, "मर्द को कभी होता नही है दर्द ?"
मरण नाही मागितलंय मी देवाशी
मी आजही आहे तुझ्या प्रेमाचा उपाशी
ते आले तर मी स्विकारीनंही,
जगून तरी काय उपयोग माझा या देही ?
मरण हाच आहे का अंतिम पर्याय
मृत्यू हाच आहे का जालीम दवाय
नाही प्रिये, मी तुझ्याशिवायही जगेन,
पुढील जन्मी देवापाशी तुलाच मागेन.
जा प्रिये, खुश रहा तू,
परकी झालीस तरी माझी आहेस तू !
जा प्रिये, खुश रहा तू,
परकी झालीस तरी माझी आहेस तू !
सदिच्छा जा घेऊन माझ्या तू,
आज दुसऱ्याचे घर सजव तू !
लेखक-श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
होतो जसा काल मी
आजही तसाच आहे |
कालही एकटाच होतो
मी आजही एकटाच आह ||
आज काल इथे आम्ही दोघच असतो
माझा एकांत आणि मी ,
तासन तास दोघं बोलत बसतो
आठवणींच्या विश्वात हरवत असतो|
आठवणीचे विश्वात तुला शोधता शोधता
पापण्यात पाणी दाटून येते||
शेवटी मनाला हेच समजावतो ,
जीवन हे असच जगायचं असतं
दुःख घेऊन सुख वाटायचं असतं
जीवन – मरण हे फक्त कोड आहे
जाता – जाता हे सोडवायचं आहे|||
लेखक -Hardik D Shah, Mumbai
कधी विरहाचे कधी प्रेमाचे
वाहुन गेलेल्या आसवांच्या प्रवाहाचे
दोन क्षण दुखचे
कधी दिवसाच्या स्वप्नाचे
कधी रात्रीच्या जगन्याचे
पाहीलेल्या त्या तुटलेल्या घराचे
दोन क्षण दुखचे
कधी वेड्या संसाराचे
कधी जपलेल्या नात्याचे
सोडुन गेलेल्या तिच्या आठवणींचे
दोन क्षण दुखचे
कधी परतीच्या वाटेचे
कधी समुद्राच्या लाटेचे
ओंजलीतल्या त्या ओल्या आसवांचे
दोन क्षण दुखचे
लेखक- योगेश र पवार (yp)
प्रत्येक वळणावर वळून पाहतोय,
तुझ्या आवाजाची प्रतीक्षा करतोय !
प्रत्येक वळणावर वळून पाहतोय,
तुझ्या आवाजाची प्रतीक्षा करतोय !
भयाण शांतता आहे प्रत्येक वळणावर,
सावलीही नाही आढळत कुणाची रस्त्यावर.
प्रत्येक वळणावर वळून पाहतोय,
तुझ्या आवाजाची प्रतीक्षा करतोय !
बेवफाईचं होती माझ्या नशिबात,
तुझी वफा चांगलंच पांग फेडतेय.
तुझी माझी झाली होती भेट जिथे
त्या वळणावर मी अजुनी उभा आहे
ती वळणे आहेत तिथेच आहेत,
फक्त तुझ्या पावलांचे ठसेच कायम आहेत.
शोधता तुला कितीतरी वर्षे लोटली
भटकता भटकता पायाला भिंगरी लागली
वाटलं त्याचा वळवणार भेटशील पुन्हा,
पाउलखुणही वाऱ्याने तुझी पुसून टाकली.
तू निघून गेलीस ती गेलीसच
पुनः फिरून नाही पहिलसचं
तुझं दुःख तेव्हा मी घेतलं होतं,
माझं सुख मी तुला दिल होतं.
वाटतंय माझं नशीब तुझं होउदे
तुला माझेच भोग प्रत्ययास येउदे
श्राप नाहीय हा माझ्या मनाचा,
पण माझे दुःख तुला कळूदे.
रात्रभर करवटे होतो बदलत
तुलाही हा अनुभव येउदे
डोळ्यांवरली झोपही उडाली होती,
तुझीही झोप क्षणभर उडुदे.
तुला वाटलं मी तुला हाक देईन
तुला वाटलं मी तुला बोलावीन
पण नाही, मीही आहे मनाचा जिद्दी,
मी नाही कधी परतून येईन.
आज मी ते वळण वळलोय
तुझ्या आवाजाला मी आज टाळलंय
प्रतीक्षेत होतो वर्षानुवर्षे आवाजाच्या,
ते वळण मी आज कायमच सोडलंय.
आजही मला तो भास होतोय
आजही लांबून तुझा आवाज येतोय
ते वळण माझ्या नजरेआड झालंय,
तुझ्या आवाजात आज अंतर पडलंय.
लेखक-श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
कवि मन पुन्हा जागी झालं
पुन्हा कविता करायला लागलं
पूर्वी प्रेम कविता करू लागलेलं
आता विरह गीत लिहायला लागलं
याला सर्वस्वी मीच जबाबदार
मग कोणावर रागे भरणार
रागे भरण्याचा पूर्ण अधिकार
तिचाच तर असणार
कवितांचा मीच गीतकार
मीच श्रोता असणार
एकदा तरी माझी कविता वाचणारं
माझ प्रेम पुन्हा डोकावणार?
लेखक -स्वरचित (सुनीत Sonnet)
जगायचं म्हणून जगतेय
या जगण्याला काय अर्थ आहे,
नुसतेच भाळणे तुझ्यावर
या भाळण्याला कोणते नाव आहे,
तुझं वावरणं साऱ्यात असतं
माझी फक्त सावली सोबत आहे,
बहरत जावं आयुष्य तुझं
माझं आयुष्य मला तुझ्यात दिसते आहे,
अपेक्षा नसतेच भावनेला
भावनाहीन झुरणं किती कठीण आहे
लेखक- swapn_prem_vedi
Check out This: Mech Arena Mod APK (v2.32.00) Robot battle multiplayer game.
विरहात रात्र रात्र
सरली आठवणीत
कधीकाळी होता एक
प्रियकर तो मनात
शपथ घेतली होती
कधी भावी मिलनाची
मार्गच आता चुकला
दोर तुटली भाग्याची
शांत त्या सागरतीरी
काढले नाव वाळूत
किना-याला यावी लाट
गेले घेऊन ते आत
बाग ती बहरलेली
राघू-मैना त्यात होते
आता एकटीच मैना
विरहाचे गीत गाते
संकटे असावी तिथे
साथ असता दोघांची
ईश्वरा नसावी अशी
“अश्रू फुले विरहाची”
लेखक -श्री सुरेश शिर्के, खारघर,पनवेल
टिक टिक घड्याळाची
करिते क्षणांस जाचक,
होत नाही महन ते एकटेपण,
आठवणींच्या दुनियेत रमून,
होते भूतकाळाचे चित्रीकरण
नयन मिटताच.
ते रूप तुझे,तो सहवास
तुझा,ते दुःख तुझे,
ती काळजी तुझी,
जणू भासते ती व्हावी
आत्ताच परिधान,
पण अणूंचा गोंधळ माजुन वाहतो
थेंबांचा प्रवाह नयन उघडताच
मनाच्या खोल कुठेतरी
विचारांचं खळबळ माजलयं
विरहाचं धुकं नात्यात दाटलयं
अश्रू आतुर आहेत वाहण्यासाठी
तुला दिलेल्या एका वचनापायी
गालांवरच्या खोट्या हास्यात
मी त्यांना अडवलंय.
तुला यायचे येऊन जा रे
घरी आपल्या घेऊन जा रे
सय येते कितीदा तरी
पुन्हा एकदा भेटून जा रे
फुले चार घेऊन जा तू
जरा गंध तू देऊन जा रे
फुलव मनाचा पिसारा रे
जरा अंगणी नाचून जा रे
बरसावे वाटते आजराणी
मनाला जरासा भिजवून जा रे
तमाच्या नभातून बाहेर तू
प्रकाशास घेऊन तू जा रे
लेखक- प्रकाश साळवी, बदलापुर -ठाणे
तुझ्या घराची वाट केव्हाच बदललीय,
तुझ्या आठवणींनी वेदनाच दिलीय !
तुझ्या घराची वाट केव्हाच बदललीय,
तुझ्या आठवणींनी वेदनाच दिलीय !
त्या घराची वीट न वीट ढासळलीय,
फक्त राखरांगोळीचं काय ती बाकी उरलीय !
तुझ्या घराची वाट केव्हाच बदललीय,
तुझ्या आठवणींनी वेदनाच दिलीय !
त्या घराने खूप पाहिल्या होत्या आशा,
फक्त निराशेचीच भिंत शिल्लक राहिलीय !
जिथे तुझे अस्तीत्वच नाही
जिथे तू स्वतःच नाहीस
ज्या घरात तुझे हास्य फुलत नाही,
तिथे येण्यात आता काहीच अर्थ नाही.
केव्हातरी होत ते भरलेलं
चार भिंतींनी ते सजलेलं
तुझ्या हास्याने ते उमललेलं,
तुझ्या शब्दांनी ते झुललेलं.
त्या घराची रयाच गेलीय
त्या घराची शोभाच गेलीय
त्या गल्लीकडे पावले वळत नाहीत आता,
त्या घराचं घरपणचं गेलंय.
जीवनात कितीही बहार येवोत
जीवन रंगांत सजलेल असो
रंगीबेरंगी कळ्यांची फुले उमलोत,
तू नाहीस तर काहीच नाही
जीवन कितीही आनंदाने भरो
जीवनात कितीही ख़ुशी येवो
जीवनात हास्याचे झरे वाहोत,
तुझ्याविना सारे फोलच आहे.
ज्या बागेत बहार नाही
जेथे कळ्याच उमलतं नाहीत
जिथे फुलेच फुलत नाहीत,
तिथे आनंद कुठून मिळेल मला ?
जिथे सारे काटेच भरलेत
झाड सारे निष्पर्ण झालेत
जेथे जीवनाचा नाही मागमूस,
तिथे येऊन मला काय मिळेल ?
तुझी पुन्हा मी आठवण काढतोय
तुझी पुन्हा एकदा वाट पाहतोय
जिथे असशील, तिथून परतून ये,
सर्व शपथ, सर्व वादे तू तोडून ये.
त्या प्रेमाची शपथ तुला
माझ्या शब्दाला जागून ये
माझ्या प्रेमाची आण तुला,
फक्त माझ्यासाठीच धावून ये.
अन्यथा माझा काही नाही भरोसा
इथून कायमचा निघून जाईन
तुझ्या आठवणीत दुःख नाही सोसायचे अजून,
हे जगच मी सोडून जाईन.
आता इथे माझे काहीच काम नाही
मला इथे थांबून काय मिळणार आहे ?
इथे तुझे वास्तव्यचं नाही प्रिये,
फक्त तुझ्या आठवणींचेच नवे घर आहे !
तुझ्या घराची वाट केव्हाच बदललीय,
तुझ्या आठवणींनी वेदनाच दिलीय !
तुझ्या घराची वाट केव्हाच बदललीय,
तुझ्या आठवणींनी वेदनाच दिलीय !
त्या घराची वीट न वीट ढासळलीय,
फक्त राखरांगोळीचं काय ती बाकी उरलीय !
लेखक- श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
कंठ दाटून आला,
मन ही माझे भरुन आले,
पाऊले माझी जड झाली,
विरहाची ती वेळ जवळ आली
हुंकारानी एका तुझ्या
हॄद्याला माझ्या हात घातला
"नको जाऊ तू आई अशी लांब
तान्हुलगं मी तुझं तुझाच सहवास बघं हवा मला"
माझ्या डोळ्यांनी तुझ्यासाठी
खुप स्वप्ने अशी बघितलीत बाळा
राहुदेत कर्तव्यात उभी मला
सारुदे हा प्रितिचा भाव भोळा
संध्याकाळ झाली पाखरांनीही वाट धरली
ओढीची तुझ्या आस लागली
दिसले माझे पाखरुं दारी
भरली प्रेमाने माझी झोळी
लेखक- देवू
Similar Keywords- प्रेम विरह चारोळ्या,विरह वेदना मराठी कविता,virah kavita marathi.
Read More:-
➥मराठी स्टेटस नाती | 60+ Nati Marathi Message
➥सकारात्मक विचार मराठी |70+ Sakaratmak Vichar
➥शेतकरी स्टेटस मराठी | 50+ Shetkari Quotes In Marathi
➥वाईट वेळ स्टेटस | वेळ मराठी स्टेटस |50+ Time Quotes In Marathi