मुलगी स्टेटस मराठी (marathi quotes on father and daughter) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या सुंदर लेख मराठीत सर्वोत्कृष्ट मुलगी, कन्या, बेटी या नात्यावरती माझी मुलगी चारोळी {proud quotes on marathi mulgi} आणि quotes वडील आणि मुलगी स्टेटस {father daughter quotes in marathi} पाहायला मिळतील ज्या आपल्याला नक्कीच आवडतील
या लेखात दिलेल्या मराठी मुलगी स्टेटस {emotional marathi quotes on father and daughter} किंवा whatsapp माझी मुलगी स्टेटस {daughter day message in marathi} ह्या आपल्याला प्रेमातील गोडवा सांगतात. मला मुलगी झाली स्टेटस {mulgi quotes in marathi} आपल्याला प्रेम करायचे कसे हे शिकवतात.तर आशा आहे कि आपल्याला हे baba ani mulgi marathi quotes जरूर आवडले असतील.
कुणाची बहिण असते ती
आई असते ती
कुणाची पत्नी तर कुणाची सून असते ती
पण याआधी आई-वडिलांची
लाडाची लेक असते ती
मी नसेल आई दिवा वंशाचा
मी आहे दिव्यातील वात
नाव चालवेन कुळाचे बाबा
मोठी होऊनी जगात
ज्या घरी मुलगी जन्माला आली
समझा तिथे लक्ष्मी आली
स्वर्गातील एक लहानसा तुकडा
देवाने पाठवला आहे माझ्या घरी
आमच्या जीवनात सुखाचा सागर
घेऊन आला आहे एक छोटीशी गोंडस परी
लेक चैतन्याचे रूप
लेक अल्लड चांदणं
लेक रंगांचे शिंपण
लेक गंध हळवं मन
लेक म्हणजे मनाचा हळवा कोपरा
लेक म्हणजे आनंदाचा अखंड झरा
लेक म्हणजे ईश्वराचे अनमोल देणे
लेक म्हणजे अमृताचे बोल
जिच्या अस्तित्वाने होती सगळे क्षण अनमोल
लाख गुलाब लावले अंगणात
तरी पण सुगंध तर
मुली च्या जन्मानेच होतो
Make Your Full Screen Red Now 💻
लेक माहेराचं सोनं
लेक सौख्याचं अंगण
लेक बासरीची धून
लेक अंगणी पैंजण
घरात छोटीशी गोंडस परी
असणं म्हणजे आनंदाचं लेणं
शर्यत लागली होती
जगातील आनंदाला एका शब्दात लिहिण्याची
ते पुस्तके शोधत बसले आणि
मी मुलगी लिहून आलो
तिच्या केवळ अस्तित्वाने आयुष्य बदलले
तिच्या जन्माने जीवनाचे सार्थक झाले
लेक माझी सप्तसूर माझे
ती श्वास अंतरीचा
तिच्याच मुळे कळाला अर्थ जीवनाचा
थोडस खरं पण वेळे नुसार बदलणारं
आईच्या घरी मुलगी काम करत असेल
तर किती काम करणार नको करू
आराम कर अस म्हांटल जात
तर मुलीच्या सासरी मुलीने कितीही काम केलं ना
तरी त्यांना ते कमीच वाटतं?असं का
लगा जर वंशाचा दिवा असेल
तर मुलगी त्या दिव्याची वात आहे
लक्ष्मीच्या पावूलांनी जी घरात येते
जिच्या पैंजणांनी सर्व घर निनादते
जिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते
जिचे निखळ हास्य संपूर्ण घर झळाळून टाकते
हे सर्व सुख त्यांच्याच नशिबी येते
ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते
मुलगी ते एक फुल आहे
जे प्रत्येक बगिच्यात फुलत नाही
भावाचे प्रेम, आईची माया
आणि वडिलांचा असते अभिमान
खरंच मुलगी म्हणजे प्रत्येक
माता-पित्याचा असते स्वाभिमान
मुलगी भार नाही
तर जीवनाचा आधार आहे
लेक हे एक असे नाजूक फुल आहे
जे केवळ भाग्यवंताच्याच अंगणात फुलते
आणि सगळे घरदार सुगंधी करते
माझ्या हाताचे बाकी बोटं
त्या बोटाला पाहून जळतात
ज्या बोटाला पकडून
माझी मुलगी चालत असते
माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा
माझी लेक म्हणजे कडकडीत उन्हातला गार वारा
माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा
माझी लेक म्हणजे आयुष्यात तेवणारा तेजस्वी दिवा
लेक हा बापासाठी भार नाही
तर आईबापाच्या जीवनाचा आधार आहे
देवही त्याच घरी लेक पाठवतो
जे भाग्यवंत देवाचे लाडके असतात
सर्वांनाच देवाकडून ही
अनमोल भेट मिळत नाही
तर काही नशीबवान लोकांच्याच घरी
देव लेकीच्या रूपाने
एक अनमोल भेट पाठवतो
बेटा तुझ्या इवल्याश्या हातात
माझ्या साऱ्या जीवनाचे सार आहे
तू म्हणजे विधात्याने दिलेली एक
लक्ष्मीरूपातील अमूल्य भेट आहे
घरात एक तरी परी असावी
एक नाजूक कळी उमलताना पाहता यावी
मनातील गुपितं तिने हळुच कानी सांगावी
जिच्या असण्याने घरात आनंदाची पहाट यावी
आईची सावली आणि वडिलांचे स्वप्न आहेस तू
काट्यांमध्ये फुललेला गुलाब आहेस तू
फक्त लेक नाहीस तर सगळ्या घराचा जीव आहेस तू
लेक माझी भाग्याची
राजकन्या आहे घराची
जिच्या सोनपावलांमुळे आहे
सुखसमृद्धी या घराची
ज्या घरात मुली असतात
तिथे सदैव आनंदाचा प्रकाश राहतो
जिथे मुली हसतात
त्या घरात सदैव सुखाचा वर्षाव होतो
माझा श्वास तू
माझा जीव तू
माझ्या जगण्यासाचा अर्थ तू
माझी लाडकी छकुली
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या बोबड्या बोलांनी
थकवा माझा पळून जातो
तुला पाहताच क्षणी
मी तुझ्यात रमून जातो
तूच आहेस माझे संपूर्ण जग
तूच आहेस माझे सुख
तूच आहेस माझ्या आयुष्याच्या वाटेवरील प्रकाश
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस
हट्ट करणारी पण कशाचा हट्ट करावा हे ठाऊक असणारी
बाहेरून कठोर पण आतून अगदी प्रेमळ
नारळासारखेच गुण असणारी
कधी एखाद्याला प्रेमानी समजवणारी
तर कधी योग्य रीतीने समाचार घेणारी
वेळ आल्यावर जगदंबेच रूप घेणारी
भाऊ बहिणींवर प्रेमाचा वर्षाव करणारी
लग्न होईपर्यंत काळजाचा तुकडा बनून राहणारी
माहेरच्या आठवणी मनात साठवूनी
बालपणीच घर त्यागून नवीन आयुष्य सुरु करणारी
नंतरही अधून मधून सर्वांची विचारपुस करणारी
दाखवायला अगदी कणखर आणि निर्भिड
पण आतून अगदी मायाळू आणि हळवी असणारी
वेळ आली तर सर्व घराची जबाबदारी उचलणारी
कुणी दुःखी कष्टी असलेलं पाहवत नाही हिला
सर्वाचे भले कर एवढेच मागते ही फक्त देवाला
आईनंतर प्रेमाचा अमर्याद असा झरा
देवाने बनवलेला करुणेचा पुतळा खरा
-rushiii
Read More:-
आम्हाला आशा आहे कि आई व मुलगी कविता आणि मुलगी आणि वडील स्टेटस आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.
तुमच्याजवळ अजून आई आणि मुलगी चारोळी {mother daughter quotes in marathi},मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन संदेश {aai ani mulgi quotes in marathi} असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले mulgi status in marathi, daughter day wishes in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.