BirthdayWishesInHindi.In
HomeBirthday WishesHindi QuotesMarathi QuotesAbout Us

Bhavpurna Shradhanjali In Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी status {death anniversary in marathi} दिलेले आहेत.ह्या विश्वात मरण कुणाला चुकले नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असे वाईट प्रसंग येतच असतात त्यावेळी आपल्या जवळच्यांना धीर देणं महत्वाचे असते.त्याकरता आपण त्याना भावपूर्ण श्रद्धांजली {Bhavpurna Shradhanjali} देऊन आपण त्याचा बरोबर आहोत. हे आपण सांगतो जीवन हे असे जगा कि आजचा दिवस आपला शेवटचा आहे . प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या असे जगा कि आपल्यामुळे दुसर्यालाही आनंद वाटावा.

जीवनात घडणाऱ्या वाईट घटनांमुळे एखाद्या व्यक्तीला आधार देण्यासाठी श्रद्धांजली प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश, miss you shradhanjali message in marathi ,श्रद्धांजलि शायरी पाठवू शकता आणि त्याच्या दुःखात सहभागी होऊ शकता. जर आपल्याला हि पोस्ट आवडली तर आमच्या अजून हि पोस्ट बघा.

Shradhanjali message in marathi

Bhavpurna Shradhanjali In Marathi
तो हसरा चेहरा
नाही कोणाला दुःखवले
मनाचा तो भोळेपणा
कधी नाही केला मोठेपणा
उडुनी गेला अचानक प्राण
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस
असा जन्म लाभावा
देहाचा चंदन व्हावा
गंध संपला तरी
सुगंध दरवळत राहावा
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
Shradhanjali message in marathi
आठवीता सहवास आपला
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज
ही श्रद्धांजली
आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
स्मृतिदिन संदेश मराठी
काळाचा महिमा काळच जाणे
कठीण तुझे अचानक जाणे
आजही घुमतो स्वर तुझा कानी
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
प्रथम वर्ष श्राद्ध मराठी संदेश
तुमचं असणं सर्वकाही होतं
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस
पवित्र स्मृतींची ज्योत तेवते
अखंड आमच्या मनी
सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी
आठवुनी अस्तित्व दिव्य तव वृत्ती भारावली
कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
मृत्यू हा जीवनाचा अंत नाही
एक नव्या जिवनाची सुरुवात आहे
तुम्ही जिथे पण रहा सुखी राहा
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
कोणत्याही व्यक्तीस गमावण्याची
वेळ कधी कोणावरच येऊ नये
पण आपल्याला जीवनात पुढे जावच लागतो
आपल्याला त्यांच्यासाठी जगावं लागतं
जे आपल्यावर खूप प्रेम करतात
तुमच्या वडिलांच्या जाण्याच
खूप दुःख झालं स्वतःला सांभाळा
तुमच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो 🙏💐
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे
देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
कष्टाने संसार थाटला पण
राहिली नाही साथ आम्हाला
आठवण येते प्रत्येक क्षणाला
आजही तुमची वाट पाहतो
यावे पुन्हा जन्माला
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
आपले लाडके ____ यांना देव आज्ञा झाली
आणि ते देवाघरी निघून गेले
त्यांच्या अचानक जाण्याने
आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
अश्रृंचे बांध फुटूनी
हृदय येते भरुनी
जाल इतक्या लवकर निघूनी
नव्हते स्वप्नीले कधी कुणी !
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
हे विधात्या पुरे पुरे रे
दुष्ट खेळ हा सारा
आकाशातून पुन्हा निखळला
एक हासरा तारा
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते
कपाटातील तुझी साडी पाहिली की
तुझी खूप आठवण येते
आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
जाणारे आपल्यानंतर एक
अशी पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
आपल्या वडिलांना देवाज्ञा
झाली ऐकून दुःख झाले
तो एक देवमाणुस होता
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आई आज तू नसलीस तरी तुझी आठवण येत राहील
तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सतत आठवण येत राहील
आई पुढच्या जन्मीही तुझ्या पोटीच मला जन्म दे!
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
आई बाबांचा लाडका तु
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा
परत येरे माझ्या सोन्या
तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
जशी वेळ निघून जाईल तशी जखम
सुद्धा भरून येईल पण आयुष्यभर
येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच
तोड नाही त्यांच्या आठवणींचे झरे
इतके की साखरही गोड नाही
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼

स्मृतिदिन संदेश मराठी

हे देवा तू मला इतकं का रडवलंस
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या
व्यक्तिला माझ्यापासून दूर का नेलंस
आई बाबांचा होता तू लाडका
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा
माघारी परतून येरे माझ्या पाखरा
एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले
आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आई बाबा घरी नसताना कायम दिला तुम्ही
आधार आता तुमच्याशिवाय जगायचे
कसे हाच आहे मोठा प्रश्न
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
सगळे म्हणतात कि
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही
आणि ती थांबतहि नाही
पण हे कोणालाच कसे समजत नाही
की लाख मित्र असले तरी
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही
आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
जी हृदयात राहत होती
ती एकच मूर्ती होती
जी जगण्याची प्रेरणा देत होती
ती एकच मूर्ती होती
ती पवित्र मूर्ती म्हणजे माझे बाबा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आयुष्यात इतक्या लवकर
आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते
नियतीने घात केला
तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला
शरीराने तू गेलास तरी मनाने
माझ्यासोबत राहशील ही अपेक्षा
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
बाबा तू जिथे असशील तिथे आमच्यावर
लक्ष ठेवून असशील माहीत आहे
पण तुझी साथ सुटली याचे दु:ख खूप आहे
बाबा तुझ्या आत्म्यास शांती लाभो 🙏🏻
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जिवलगा भावपूर्ण श्रद्धांजली
भावा निःशब्द केल यार तु
तुझी आठवण सदैव येतच राहील
असा दिवस दाखवशील
अस कधीच नव्हतं वाटलं रे
तूझ्या साठी कधी पण आणि
कुठे पण होतो रे आम्ही पण
आमच्यावर विश्वास नाही ठेवला तु
पण तुझ्या विना माझे पुढील
आयुष्य शून्य आहे इतकंच रे😢
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
डोळ्यात न दाखवता हे ज्यांनी
माझ्यावर आभाळाएवढे प्रेम केलं
ते आज मला सोडून गेले
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुमची येत राहिल
बाबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो 🙏💐
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
काळाने घात केला
तुला मला कायमचे दूर केले
तुझी आठवण येत राहील
जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
काही जण आयुष्यातून कधीच जाऊ नये अशी वाटतात
आजोबा सगळं लहानपण तुमच्यासोबत गेलं
आता तुमच्याशिवाय एकही क्षण घालवणे कठीण आहे
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जड अंतःकरणाने
मी त्या पवित्र आत्म्यास
चिरंतन शांतता मिळवी
यासाठी प्रार्थना करतो
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

Font Changer Online

आज रडू माझे आवरत नाही
तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
आजी होतीच माझी दुसरी आई
प्रेमळ त्या विठूची रखुमाई
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा !
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
अत्यंत दुर्देवी असा दिवस
देव हे सहन करण्याची ताकद
कुटुंबियांना देवो
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
मृत्यू टाळता आले असते तर
फार बरे झाले असते
आज तुला श्रद्धांजली देण्याची
वेळ आली नसती
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
कर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्पर
अशा ____ यांच्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
पुन्हा हातात हात घेऊन
तुझ्यासोबत चालता येणार नाही
पण मला माहीत आहे तू
कायम माझ्या सोबत असणार आहेस
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
क्षणोक्षणी आमच्या मनी
तुमचीच आहे आठवण
हीच आमच्या जीवनातील
अनमोल अशी साठवण
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
मायाळू प्रेमळ नसलात तरी
कधीही आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही
आता अचानक सोडून गेल्यावर मला अजिबात करमत नाही
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
तुमचे वडील आमच्यासाठी एक आदर्श होते
आणि आदर्श कायम राहतात
या जीवनात ते नेहमी अमर असतात
तुमच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
मृत्यू हे अंतिम सत्य
आणि शरीर हे नश्वर आहे
पण तरी देखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
जीवनात संकटे असो किंवा असो कोणता आनंद
मनाला असो चिंता कशाची आठवण येते फक्त आई तुझी
आता जगू कसा मी आई का गेली सोडूनी
आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
तू गेल्याची बातमी ऐकून आजही हळहळते मन
वाटे खोटे असावे हे सगळे तरी क्षणभर
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Fancy Text Generator

देव तुमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती देवो
या दुःखाच्या वेळेत आम्ही तुमच्या बरोबर आहोत
आमची गरज पडल्यास आमची आठवण काढा
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
माझ्या आठवणींच्या कप्प्यात तू आजही अशीच आहे
आई आज आमच्यात नाहीस यावर माझा विश्वासच होत नाही
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻

प्रथम वर्ष श्राद्ध मराठी संदेश

ज्यांच्यावर आपण अपार प्रेम करतो
त्यांच्या ह्रदयात आपण कधीच मरत नाही
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
जे झाले ते खूप वाईट झाले
यावर विश्वासच बसत नाही
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
आणि त्यांच्या परिवाराला
या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
तुमच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाली
जन्म आणि मृत्यू हे मानवाच्या हाती नसतात
तुमच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
अश्रू लपवण्याच्या नादात मी
मलाच दोष देत राहिले
आणि या खोट्या प्रयत्नात
मी तुला आणखीच आठवत राहिले
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
व्रतवैकल्यांचा भांडार पोथी पुराणाचे सर
साऱ्या कुटुंबाचा आधार अशी माझी आजी
काय सांगू तिच्या हातातली चवदार जादू
चवदार तिची पुरणपोळी चविष्ट तिचे लाडू
अशी माझी आजी
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
आई तुझ्या आठवणींशिवाय
माझा एकही दिवस जात नाही
का गेलीस तू मला सोडून
आता मला तुझ्याशिवाय
अजिबात करमत नाही
तुझ्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
बाबा तू निघून गेलास तरीही
आजही जवळ आहेस
तुला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
जखमाही कालांतराने भरतात
पण जीवनात हरवलेला प्रवास
पुन्हा परतून येत नाही
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
दोस्तीच्या दुनियेतला
आमचा राजा हरपला
भावा तुझ्या आत्म्यास
चिरशांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा 🙏💐🌼
कोणाशी वाईट वागला नाहीस
तू होता माणूस भला
आमच्या जीवाला मात्र असा
तू चटका लावून गेला
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
अजून म्हटलं की आठवतं
आजोबांबरोबर पाहिलेलं प्रत्येक दृश्य
आजीचं तिच्या ताटातलं भरवणं
आणि त्यांच्या सोबत घडलेल्या
माझे संपूर्ण आयुष्य
आजोबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
तुमच्या आईचे निधन झाल्याबद्दल आम्हाला खूप दुःख आहे
ईश्वराने त्यांच्या दिव्य आत्म्याला अशा ठिकाणी ठेवल आहे
जिथून त्या आपल्याला पाहत असतील
त्यामुळे आपण रडून त्यांना दुखी करू नये
त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करावी
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आई तुझा आवाज आता कानी पडणार नाही
याचे दु:ख होत आहे पण तू जिथे असशील तिथे
माझ्यावर लक्ष ठेवशील अशी अपेक्षा आहे
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
आज तुझ्या आठवणीने फार गहिवरुन येत आहे
तुझी आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे
पण तरीदेखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
आठवतो ते प्रेम तुझ्या रागवण्यामागे लपलेले
आठवतो तो क्षण जो तुझ्या सोबत घालवला
तुझ्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
तुझे आजोबा खूप छान व्यक्ती होते
चांगले लोक कधी मरत नाहीत
ते आपल्या आठवणींमध्ये अमर होतात
त्यांच्या अनुभवाची आणि मार्गदर्शनाची कमी
आपल्याला जाणवेल
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
ढग येतात पण पाऊस पडत नाही
आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू
सांग आई मी तुला कसे विसरू
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
जन्म मृत्यूचा फैसला
कोणीच करत नाही
जन्माचा आनंद पण मृत्यूचे दु:ख
काही केल्या पचत नाही
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
माणूस किती किमतीचे कपडे वापरतो
यावरून त्याची किंमत होत नसते
तो दुसऱ्यांची किती मदत करतो
यावरून त्याची किंमत ठरत असते
आज अशा मौल्यवान माणूस हरवला
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
डोंगराच्या मागे गेलेला सूर्य
दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसतो
पण ढंगाच्या पलीकडे गेलेला
आपला माणूस
पुन्हा कधीही दिसत नाही
देव तुमच्या आत्म्यास चिरशांती देवो
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
तुमची आई एक महान आई होती
ती तुमच्यावर खूप प्रेम करत होती
आणि करत राहील
त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
जीवन हे एक असे युद्ध आहे
जे प्रत्येक जण शेवटी अर्धच असतो
ह्या दुनिया ला सोडून
देवाकडे कधीतरी जातच असतो
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा जात नाही
तुझ्या आठवणींशिवाय माझ्या आयुष्याला कोणताच आधार नाही
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
परिवार ज्याचे मंदिर होते
प्रेम ज्याची शक्ती होती
परिश्रम ज्याचे कर्तव्य होते
परमार्थ ज्यांची भक्ती होती
तुझ्या दिव्यआत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
संस्काराचे नाते तुटता तुटत नाही
माणसे संपली तरी संबंध मिटत नाही
शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
फक्त तुम्हीच नाही तर
आज आम्ही पण आई गमावली आहे
कारण त्या माझ्या आई सारख्याच होत्या
आपण त्यांना आपल्या आठवणीत कायम ठेवू
त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
💐🙏|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏💐
कोठेही न मागता मिळालेलं
भरभरुन वरदान म्हणजे आई
विधात्याच्या कृपेचं निर्मळ वरदान आई
तुझी आठवण कायम येत राहील
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
अस्वस्थ होतयं मन
अजूनही येतेय आठवण बाबा
तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दररोज
दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
अंगणी वसंत फुलला
उरली नाही साथ आम्हाला
आठवण येते क्षणाक्षणाला
तुम्ही फिरुनी यावे जन्माला
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
आज माझा प्रत्येक शब्द
ज्वालाकांड घडविणारा ठरो
हीच तुझ्या मृत भावनांना माझ्या
जिवंत शब्दांची श्रद्धांजली ठरो
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
शून्यामधूनी विश्व् निर्मूनी
कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी
लोभ माया प्रीती देवूनी
सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर जाहला तुम्ही जीवनी
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
आठवण येते त्या प्रेमाची
जे प्रेम त्यांच्या ओरडण्यामागे होत
आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची
जे क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते
बाबा तुमची आठवण कायम येत राहील
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
सुखात कायम दिली तुझी साथ
तू नसतानाही राहील तशीच साथ
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!

भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस

डोळे भरून येतात तुझा फोटो बघितल्यावर
जीवन असे जगलास की मृत्यूला पण लाज येईल
तुझे आयुष्य छोटे होते पण सुंदर होते
प्रत्येक ठिकाणी सुगंध पसरवून
आमच्या आयुष्यातून निघून गेलास
आठवणीत मात्र कायम राहशील
देव तुझ्या आत्म्यास शांती प्रदान करू
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
जाण्याची वेळ नव्हती
थांबण्यासाठी खुप होते
तरीही ध्यानीमनी नसताना
आम्हाला सोडुन गेलास यापेक्षा
दुर्दैव ते काय हो ?
रडविले तु आम्हाला
देवापुढे खरंच कुणाचं चालेना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
कोरोनाग्रस्त लोकांची सेवा करता करता
स्वतः कोरोना मुळे मरण पावला
अशा पुण्य आत्म्यास शांती मिळो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
आयुष्यात अनेक संकटांवर तू मात केलीस
पण आज कोरोना विरुद्ध लढाईत तू हरलास
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
तू शिवलेल्या गोधडीची उब
आजही मला जाणवते
तू प्रत्यक्षात नसली तरी
तुझी माया सोबत आहे
आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आज आमच्यात नसलात तरी तुमच्या
आठवणींचे गाठोडे मी कायम जपून ठेवणार आहे
तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच
इतरांची काळजी घेणार आहे
बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
आई इतके जवळचे या जगात कोणीही नव्हते
मला जन्म दिलास तू तुझे उपकार
सात जन्मातही फिटणार नाहीत
हृदयातून तुझ्या आठवणी कधीही मिटणार नाहीत
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
अजूनही होतो भास
तुम्ही आहात जवळपास
शांती लाभो तुमच्या आत्म्यास
हीच प्रार्थना परमेश्वरास
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
जीवन हे क्षणभंगुर आहे
हे तुझ्या जाण्यानंतर मला कळले
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
भारत मातेच्या वीर सुपुत्रांना
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
देव या परम आत्म्यास शांती देवो
आता तू नसलीस तरीही
आठवण तुझी येत राहील
तुझ्या मांडीवर डोके ठेवल्याशिवाय
झोप मला कशी येईल
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
भावपुर्ण श्रद्धांजली भाऊ
तु नेहमी आम्हाला मोठ्या भावाप्रमाणे जिव लावला
कुणी अडचणी मध्ये असेल तर तुला शक्य
होईल तेवढी मदत तु करायचा
आमच्या सोबत राहुन आमच्या वयाचा
होऊन मजा मस्करी करायचा
कधी चिडला कधी रागावलास
पण कोणतीही गोष्ट मनावर घेतली नाही तु
तुझी कमी नेहमी जाणवत राहील भाऊ
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
सगळे म्हणतात की एक मित्र गेल्याने
दुनिया संपत नाही आणि ती थांबतही
नाही पण हे कोणालाच कसे समजत
नाही की लाख मित्र असले तरी त्या
एकाची कमी कधी पूर्ण
होऊ शकत नाही
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼
आई तु अद्भुत हे जीवन जगले
जीवनात तू बरेच धडे मला शिकवले
तुझ्या आठवणी कायम हृदयात राहतील
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

भावपूर्ण श्रद्धांजली कशी द्यावी ?

भावपूर्ण श्रद्धांजली देण्याची पद्धती विविध असू शकतात, तसेच ती आपल्या संदर्भानुसार बदलू शकते. तुम्ही खालील पद्धतींपैकी कोणतीही निवडू शकता:

1. संदेश लिहून श्रद्धांजली देणे: आपले संदेश लिहून श्रद्धांजली देणे एक उत्तम पद्धत आहे. त्यामुळे आपण त्यांच्या मृत्यूची खात्री घेऊ शकता आणि त्यांच्यासाठी शोक संदेश व्यक्त करू शकता.

2. चित्रे दाखवणे: आपण चित्रे दाखवून त्यांच्या स्मृतींचा आदर व्यक्त करू शकता. आपण त्यांच्या एक संगतीला, समाजातील व्यक्तीला किंवा त्यांच्या परिवारातील किंवा मित्रांना फोटोवर लिहू शकता.

3. पुष्प देणे: आपण श्रद्धांजली देण्याच्या संदर्भात पुष्प देऊ शकता. हे आपल्या आदराचे व्यक्त करण्यासाठी एक उत्तम पद्धत आहे.

4. श्रद्धांजलीच्या शब्दांचा उपयोग करणे: आपण श्रद्धांजली भावनेच्या शब्दांचा उपयोग करून त्यांना आदर व्यक्त करू शकता.

आम्हाला आशा आहे कि Bhavpurna Shradhanjali Marathi | शोकसंदेश मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून दुःखद निधन संदेश मराठी,श्रद्धांजलि संदेश फोटो, Shok Sandesh in Marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले पुण्यस्मरण मराठी संदेश वडिलांसाठी ,भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी दादा ,Shradhanjali Photos आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

Read More:-
200+ भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई
100+ पुण्यस्मरण मराठी संदेश वडिलांसाठी
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी दादा
100+ प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश आजोबा
100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजी
100+ भावपूर्ण श्रद्धांजली काका
100+ भावपूर्ण श्रद्धांजली मामा मराठी
100+ दुःखद निधन संदेश मराठी मित्र
100+ भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी